उत्तराखंड जलप्रलयातील मृतांचा आकडा 50 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवभूमी उत्तराखंडच्या भीषण जलप्रलयातील मृतांचा आकडा 50 वर गेला आहे. चमोली जिह्यातील तपोवन परिसरात रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यात आली आहे. रविवारी रेस्क्यू ऑपरेशनच्या आठव्या दिवशी तपोवन येथील एनटीपीसीच्या बोगद्यात 5, रैणी गावात 6 तर रुद्रप्रयागमध्ये 1 असे एकूण 12 मृतदेह सापडले. जलप्रलयात एकूण 206 मजूर बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

यातील 154 लोकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. रविवारी सकाळी दोन मृतदेह हाती लागल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यात आली. सायंकाळी बोगद्यात आणखी एक मृतदेह सापडल्याचे वृत्त आहे. बोगद्यात अजून 32 कामगार अडकल्याची भिती आहे. 100 हून अधिक शास्त्र्ाज्ञ व जवानांची फौज बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचा शोध घेत आहेत.