
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवातिया, इशान किशन या युवा खेळाडूंना संघात घेण्यात आली आहे. त्या सोबतच रोहीत शर्मा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, रिषभ पंत यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. मात्र टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याचा मात्र संघात समावेश केलेला नाही.
BCCI announces squad for the upcoming five-match T20I series against England to be played at Sardar Patel Stadium, Motera in Ahmedabad from March 12.
— ANI (@ANI) February 20, 2021
टी-20 साठी संघ –
विराट कोहली, रोहीत शर्मा, के.एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, रिषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवातिया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
एकाच मैदानावर होणार पाचही सामने
इंग्लंडविरोधात होणारे पाचही टी-20 सामने हे अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडीयमवर होणार आहेत. पहिला सामना 12 मार्च, दुसरा 14 मार्च, तिसरा 16 मार्च, चौथा 18 मार्च व पाचवा 20 मार्चला होणार आहे.




























































