
गेली सहा दशके पार्ले टिळक विद्यालयाच्या पॅन्टीनमधून खमंग, गरमागरम बटाटावडा खायला घालून समस्त पार्लेकरांना तृप्त करणारे बाबू सितापराव उर्फ बाबू वडावाले यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे हेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. बाबूचा वडा हा ब्रॅण्ड त्यांनी निर्माण केला होता. त्याची चव अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांनी चाखली आहे.
बाबू सितापराव हे मूळचे रायगडमधील पाली गावचे. 1954 साली ते पोटापाण्यासाठी मुंबईत आहे आणि विलेपार्ले येथे अप्पा जोगळेकर यांच्याकडे कामाला लागले. त्यावेळी जोगळेकर यांच्याकडे पार्ले टिळक शाळेच्या पँटिंगची जबाबदारी होती. पुढे जोगळेकर यांनी प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करणाऱ्या बाबूंवर पार्ले टिळक विद्यालयाच्या पँटिंगची जबाबदारी सोपवली. त्यानंतर बाबू यांनी अल्पकाळातच बाबूचा वडा हा ब्रँड तयार केला. बटाटावडा आणि पट्टी समोसा, त्यासोबत मिळणारी खास चटणी हे त्यांच्या पँटिंगचे वैशिष्टय़ होते. त्यांनी चव आणि दर्जा यात पुठलीही तडजोड केली नाही. बाबूचा वडा खाण्यासाठी लोक दूरवरून येऊ लागले. त्यांनी बाबू वडय़ाच्या विलेपार्ले आणि अंधेरी येथे शाखा सुरू केल्या. त्यांच्या निधनाने समस्त पार्लेकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.





























































