कामगार उपायुक्त कार्यालयात चोरी; संगणक, पंखे लांबविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातून चोरट्यांनी संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 26 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान घडली आहे. याप्रकरणी कामगार उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रशांत वंजारी यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान विभाग कार्यालय एका शेडमध्ये आहे. 26 ते 1 फेब्रुवारीदरम्यान चोरट्यांनी शेडचा पत्रा उचकटून संगणक, सीपीयू यंत्र, तीन पंखे असा 22 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करत आहेत.