
कोरोना काळात राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला जबर फटका बसला यातून सुटका व्हावी यासाठी राज्य सरकारने स्टॅम्प डय़ुटीवर सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. ही सवलत आणखीन 12 महिन्यांनी वाढवून 31 मार्च 2022 पर्यंत करावी, अशी मागणी व्रेडाई एमसीएचआयतर्फे करण्यात आली आहे. यामुळे स्टॅम्प डय़ुटी कमी केल्यामुळे गृहखरेदीचा वाढलेला कल, प्रॉपर्टी नोंदणीचे वाढलेले प्रमाण, वाढलेली रोजगारनिर्मिती आणि राज्यासाठी झालेले कर संकलन यावर भर देत यामुळे या उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या मागणीसाठी संस्थेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीत केलेल्या सादरीकरणात वरील मागणी करण्यात आली आहे. या मागणीबद्दल व्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले, ‘सध्याच्या महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्राला आघाडीवर ठेवण्यात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीचे आणि दूरदृष्टीचे आम्ही काwतुक करतो. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये विक्रमी प्रॉपर्टी नोंदणी झाली आहे आणि गृहखरेदीदारांचा घरखरेदीकडे कल वाढू लागला आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प डय़ुटीवरील सवलतीचा कालावधी पुढील 12 महिन्यांसाठी वाढवावा जेणेकरून सध्याचा वेग कायम राहील. त्याचप्रमाणे या उद्योगाशी संलग्न असलेल्या 250 टक्के पूरक क्षेत्रांचा विचार करता ही गुंतवणुकीचे सकारात्मक चक्र सुरू राहील. परिणामी, अधिक रोजगारनिर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले.




























































