
कोरोनामुळे दहावी-बारावीची परीक्षा देता न येणाऱया विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱया परीक्षा काळात विद्यार्थी कोरोनाबाधित असेल किंवा घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील तसेच विद्यार्थी राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाईल.





























































