माजलगावात तेल पॅकिंग करणाऱ्या युनिटला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील नवीन मोंढयात असलेल्या तेल पँकिंग करणाऱ्या युनिटला गुरुवारी पहाटे अचानक आग लागल्याने यात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा कारखाना नवीन मोंढ्यातील संतोष अब्बड यांच्या मालकीच्या महावीर ट्रेडिंग कंपनी होता. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागल्याने याठिकाणी असलेल्या खाद्यतेलाचे व त्याचे पॅकिंग मटेरियल पूर्णतः जळून खाक झाले.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही आग विझविण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठी कसरत करून विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग तेलामुळे जास्त भडकू लागली. आग विझविण्यासाठी माजलगाव नगरपालिका ,सोळंके कारखाना , गेवराई नगरपालिका आदी ठिकाणाहून अग्निशामक दल येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत मोठी हानी झाली असल्याचा अंदाज आहे.