
कुणीही विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचा व कोरोनाविषयक माहितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, जिह्यात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची चेकनाक्यावर टेस्ट केली जातेय. याखेरीज रुग्णालयांमध्ये दाखल होणारे कोणत्याही प्रकारचे रुग्ण व गर्दी करणाऱया नातेवाईकांची टेस्ट केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट
कुडाळ येथील महिला रुग्णालयात नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येत असून आवश्यकता वाटल्यास कणकवली उपजिल्हा रुग्णालयालाही ऑक्सिजन प्लांट देण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.
रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया कोणत्याही आजाराचा रुग्ण आणि त्याच्यासोबतच्या नातेवाईकांचीही टेस्ट करण्याच्या सूचना, कणकवलीत दोन ‘भटके’ पॉझिटिव्ह
संचारबंदी निर्बंध लागू असताना विनाकारण फिरणाऱयांची शनिवारी कणकवली पटवर्धन चौकात सरप्राईज कोविड अँटिजेंन रॅपिड तपासणी सुरू करण्यात आली. त्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णही फिरताना आरोग्य विभागाच्या जाळ्यात सापडले. सकाळपासून 10 जणांच्या केलेल्या तपासणी दोन जण पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांना क्वारंटाईन करून उपचारासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी सुविधा सावंत यांनी दिली.


























































