मैं जाने के लिये नही, भेजने के लिये आया हूँ; सलमानच्या राधेचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ईद मुबारक’ म्हणत सलमान खान पुन्हा एकदा ईदच्या मुहुर्तावर चाहत्यांना भेटायला आला आहे. सलमानच्या आगामी बहुचर्चित राधे चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. जबरदस्त अॅक्शन आणि खणखणीत डायलॉग असलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

राधे चित्रपट ईदला म्हणजेच 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आज त्याचा ट्रेलर रिलीज झाला असून यात सलमान व निगेटिव्ह भूमिकेत दिसणाऱ्या रणदीप हुड्डामधील जबरदस्त अॅक्शन सिन्सची चाहत्यांना मेजवानी मिळाली.

प्रभुदेवाचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पटाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रणदीप हुड्डा हा निगेटिव्ह भूमिकेत दिसत आहे. या व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, प्रवीण तरडे यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट 13 मे रोजी जगभरात रिलीज होणार असून काही देशात चित्रपट थिएटरमध्ये तर काही देशात झी-5 वर प्रदर्शित होणार आहे.