पोलीस आयुक्तांनी घेतला नाकाबंदीचा आढावा; फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याला दिली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदीसह पेट्रोलिंगवर भर देण्यार येतो की नाही याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांना भेट दिली. त्यानंतर नाकाबंदी पॉईंटवर जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच कोरोना संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार तंतोतंत पालन करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही पोलीस ठाण्यांना भेट दिल्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी बेलबाग चौकातिल नाकाबंदी पॉईन्ट चेक करुन बंदोबस्तावरील अंमलदारांशी चर्चा केली. बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार कर्तव्य सतर्कतेने करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनतर त्यांनी मंडई परिसरात लॉकडाऊनच्या अनुषंगाने अचानक भेट दिली दिली.

मंडई परिसरातील आस्थापना वेळेत बंद असल्यामुळे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. मंडई परिसरात जाऊन बंदोबस्तावरील अंमलदारांशी चर्चा करुन बंदोबस्त सतर्क असलेबाबत कौतुक केले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टीकोळे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने हद्दीत करीत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. झोनमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करून घेऊन बंदोबस्त करण्यासाठी प्राधान्य दिल्याने आयुक्तांनी त्यांचे कौतूक केले आहे.