
देशभरात कोरोनाची दुसऱया लाटेचा कहर सुरू असताना चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फार मोठे यश मिळण्याची शक्यता नाही असा ‘एक्झीट पोल’च्या अंदाजावरून स्पष्ट झाले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा मोठय़ा प्रमाणावर वाढतील पण सत्ता पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच येईल असा अंदाज बहुतांशी वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झीट पोल’ने व्यक्त केला आहे. आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखेल. तामिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये पुन्हा एलडीएफ ही माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी सत्तेवर येईल. पुद्दुचेरीत सत्ताबदल होणार असून, येथे भाजपच्या एनडीएची सत्ता येईल असा अंदाज आहे.
तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान झाले. आसाममध्ये तीन टप्प्यात तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यात मतदान घेण्यात आले. गुरूवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. रविवारी (दि. 2) चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे निकाल लागणार आहेत. भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीयमंत्र्यांच्या सभा, रोड शो झाले. भाजपचे देशभरातील अनेक खासदार, आमदार पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. दुसरीकडे तुणमूल काँग्रेसची धुरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खांद्यावर होती. पायाला दुखापत झाली असतानाही ममता बॅनर्जी यांनी व्हील चेअरवर एकहाती प्रचाराची धुरा संभाळली. पश्चिम बंगालच्या जनतेने तिसऱयांदा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखविल्याचे ‘एक्झिट पोल’च्या अंदाजावरून स्पष्ट होते. मात्र, येथे भाजपच्या जागा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगाल (एकूण जागा – 294, बहुमतासाठी 148)
वृत्तवाहिनी तृणमूल भाजप डावे + काँग्रेस
एबीपी 152-164 109-129 14-25
टाईम्सनाऊ 158 118 19
एनडीटीव्ही 148 131 –
न्यूज-18 162 115 15
इंडिया टुडे 130-156 134 160 –
तामीळनाडू (एकूण जागा – 234, बहुमतासाठी 118)
वृत्तवाहिनी द्रमुक +काँग्रेस अण्णाद्रमुक+ भाजप
एनडीटिव्ही 174 56
ऑक्सिस 175-195 38-54
सीएनएक्स 160-170 58-68
टुडे चाणक्य 164-186 46-68
आसाम (एकूण जागा – 126, बहुमतासाठी 64)
वृत्तवाहिनी एनडीए काँग्रेस आघाडी इतर
एबीपी 58-79 53-66 0-5
इंडिया टुडे 75-85 40-50 3-4
एनडीटीव्ही 69 54 –
केरळ (एकूण जागा – 140, बहुमतासाठी 72)
वृत्तवाहिनी एलडीएफ युडीएफ
एनडीटिव्ही 88 50
इंडिया टुडे 104-120 20-36
एबीपी 71-77 62-68
























































