मोदी अहंकार सोडा! सोनियांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. कोरोनावर आपण मात केली, अशा खोटय़ा अविर्भावात राहिल्याचे परिणाम देशाला आज भोगावे लागत आहेत. अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने आता त्यातून बाहेर पडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांसोबत एकत्र उभे राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन   काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यांनी केले.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदारांची ऑनलाईन बैठक शनिवारी पार पडली. यावेळी सोनिया गांधी यांनी पेंद्र सरकारच्या बेजबाबदार कार्यशैलीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर लाखो लोक आरोग्य सुविधांअभावी तडफडत आहेत, देशात असे अभूतपूर्व व दुर्दैवी चित्र निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मात्र, जबाबदारीपासून पळ काढत आहे, अशा शब्दांत  मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सरकारचे विशेषाधिकार समूह, कार्यबल समूह तसेच संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समिती तसेच अनेक जाणकार तज्ञांनी, वैद्यकीय तज्ञांनी देशावर पुन्हा कोरोनाचे मोठे संकट येणार असल्याची जाणीव मोदी सरकारला करून दिली होती. मात्र, अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या सरकारने कोरोनावर मात केल्याचे भ्रामक चित्र जगभरात निर्माण केले होते. त्याची जबर किंमत देशाला मोजावी लागत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

कोरोना स्थितीतीवर चर्चा करण्यासाठी तसेच जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.