शासकीय अधिकाऱ्यांच्या 30 जूनपर्यंत बदल्या होणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे येत्या 30 जूनपर्यंत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष संपल्यावर सर्वसाधारणपणे शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. एप्रिल किंवा मे महिन्यात बदल्याचे आदेश निघतात. कोरोनाच्या संकटामुळे बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मागील वर्षी 31 जुलैपर्यंत बदल्या न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. आता मे महिन्यात कोरोनाच्या संकटात बदलीची टांगती तलवार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर होती. पण येत्या 30 जूनपर्यंत बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.