
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पहिला व दुसरा डोस घेणाऱयांची संख्या धरून 2 कोटींचा टप्पा गाठला आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
राज्यात सोमवारी 1 हजार 239 लसीकरण पेंद्रांच्या माध्यमातून सुमारे 99 हजार 699 नागरिकांना लस देण्यात आली होती. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.



























































