
ब्राझिलमधील प्रसिद्द गायक केविनचे दोन आठवड्यांपूर्वीच लग्न झाले होते. केविनने त्याच्या पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या महिलेशी लग्न केले होते. लग्न होऊनही केविनचा बाहेरख्याली पणा कमी होत नव्हता व तो बाहेरख्याली पणा त्याला चांगालाच महागात पडला.
केविन हा ब्राझिलमधील रियो दी जेनेरियो शहरात राहतो. तो तेथील एक प्रसिद्ध गायक असून त्याचे सोशळ मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. प्रसिद्ध फुटबॉलपटू न्येमार देखील त्याला फॉलो करतो. केविनचे दोन आठवड्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोन दिवसांपूर्वी केविन त्याचा मित्र विक्टरसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथे विक्टरची ओळख बियांका नावाच्या मॉडेलशी झाली. विक्टरने बियांकाला त्यांच्यासोबत एकत्र सेक्स करण्यासाठी तयार केले. बियांकाने त्यासाठी प्रत्येकी 400 डॉलर द्यावे लागतील असे सांगितले. त्या दरम्यान आणखी एका व्यक्तीलाही बियांकासोबत सेक्स करायची इच्छा झाली. त्याने विक्टरचे बियांकासोबतचे बोलणे ऐकले होते. त्याने विक्टरकडे त्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र विक्टरने त्याला तेथून पळवून लावले.
त्या व्यक्तीला त्याचा झालेला अपमान सहन झाला नाही. त्यामुळे त्याने केविनच्या पत्नीला सर्व प्रकार सांगण्याचा निर्णय घेतला. त्याने केविनची पत्नी डियोलेनला सर्व सांगितले व तो तिला तेथे घेऊन आला. त्यानंतर डियोलेन केविनच्या रुमवर गेली. दरवाज्यात आपली पत्नी उभी आहे हे पाहिल्यानंतर केविन हादरला. त्याने बालकीनीत लपण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून तोल जाऊन तो खाली पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.
केविनच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. फुटबॉलपटू न्येमारने देखील त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.




























































