
स्वातंत्र्यलढय़ात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 138व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा करण्यात आली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याची निर्मिती संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत.
‘स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणे अजून बाकी आहे,’ असे म्हणत निर्माते संदीप सिंह यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. चित्रपटाबाबत संदीप सिंह म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोलाचे योगदान आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यांचे हे योगदान आणि त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टींवर आम्ही चित्रपटातून प्रकाश टाकणार आहोत.’


























































