
>> शांताराम वाघ
सध्या पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. पेट्रोलच्या भावाने तर शंभरी गाठली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. याबरोबरच स्वयंपाकाच्या घरगुती गॅसचीसुद्धा वाढ झाल्यामुळे गृहिणीपुढे संकट उभे राहिले आहे. नुकतेच दिल्ली येथे पेंद्रीय रस्ते बांधणी व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गो इलेक्ट्रिक या कार्यक्रमात बोलताना इलेक्ट्रिक वाहनांची गरज प्रतिपादन केली. यामध्ये सरकारमधील सर्व अधिकाऱयांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत अशी सूचना त्यांनी केली आहे. साहजिकच त्यामुळे सरकारी बजेट थोडे सावरेल असे त्यांना वाटते. त्या सूचनेबरोबरच घरगुती स्वयंपाक करताना इलेक्ट्रिक उपकरणे विकत घेण्यासाठी सरकारने सवलतीचा विचार करावा असेही सुचविले आहे. या उपकरणावर सरकार सबसिडी देत नाही, त्यासाठी मदत करावयास हवी असे त्यांना वाटते. गडकरींच्या दोन्ही सूचना अत्यंत योग्य आहेत. आज युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी पेट्रोल व डिझेलच्या वाहनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने उपयोगात आणण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. ब्रशेल्स, रोम अथेन्समध्ये 2025 नंतर डिझेल, पेट्रोलवर चालणाऱया कार दिसणार नाहीत. ब्रिटनने 2030 पर्यंतचा डिझेल, पेट्रोलच्या वाहनांना परवानगी दिली आहे. जर्मनीनेसुद्धा असाच कार्यक्रम आखला आहे. एकटय़ा दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केल्यास प्रत्येक महिन्याला 30 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. देशात सर्वच ठिकाणी प्रथम सरकारी अधिकाऱयांना इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग हळूहळू करावयास लावल्यास शेकडो कोटींची बचत अपेक्षित आहे. त्याचबरोबर नागरिकांनीसुद्धा इलेक्ट्रिक वाहने वापरावीत. यासाठी जनजागृती करावी. यासाठी मुख्य अडचण म्हणजे चार्ंजग करण्याच्या सुविधा अर्थात स्टेशन्स अनेक ठिकाणी व्हावीत. तसेच त्या वाहनासाठी ज्या इलेक्ट्रिक बॅटऱया लागतात त्यांच्या किमती माफक असाव्यात, असे केल्यास ग्राहक इलेक्ट्रिक वाहने वापरू शकतील. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावयास हवा.






























































