
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या प्रशासनामार्फत करीत होतो त्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रशासनामार्फत कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या तपासण्या कराव्या अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अधिकार्यांन दिल्या आहेत. संपर्कातील तपासण्याची पहिल्या टप्प्याप्रमाणे मोहिम तालुका प्रशासनाने ग्रामस्तरीय समितींच्या माध्यमातून हाती घ्यावी व कोरोना पासून लोकांना वाचवावे अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, बीट अंमलदार यांचा समावेश करावा. संपर्कातील तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई करावी असेही देसाई यांनी सांगितले.
पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना संख्येला रोखण्याकरीता आज कोयनानगर (ता.पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणालेकी , तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. त्यामानाने टेस्टींग रेट फार कमी आहे. आज तालुक्यात एकूण 557 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 426 कोरेाना बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे तर पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या तिन्ही कोरोना केअर सेंटरमध्ये अनुक्रमे 22, 45 व 32 याप्रमाणे कोरेाना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आज घडीला दहा गांवे हॉटस्पॅाट आहेत. या दहा गांवात रुग्णसंख्या जास्त आहे.त्या रुग्णांना उपचार देण्याचे काम सुरु आहे.मात्र तपासण्या वाढल्या पाहिजेत याकरीता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घ्यावी. तालुका प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करा असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्यामुळे लॉकडाऊन काही लगेच उठणार नाही. त्यामुळे आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगून ते म्हणाले, मागील वर्षी कोरेाना जेव्हा आला तेव्हा कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लगेच आपण प्रशासनामार्फत शोधून त्याची तपासणी करण्याचे काम करीत होतो आताही करण्यात याव्यात. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घ्यावी याकरीता पोलीस यंत्रणेची काहीही आवश्यकता लागली तरी ती घ्यावी असेही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले.

























































