
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जवळजवळ 250 पत्रे उपलब्ध आहेत. यातील काही पत्रांतून महाराजांनी या वतनदारांचे वाद सोडवून त्यांना नवीन सनदा दिल्याचे दिसते. या 250 पत्रांत तीन-चार मोजकीच पत्रे स्त्र्ायांना दिलेली आहेत. त्यापैकी एक पुण्यातील कसबा गणपतीचे पुजारी रंगनाथ सिदभट ठाकर यांच्या पत्नी जानकी यांना दिलेले आहे. त्यांच्या वतनाच्या वादावर निर्णय देताना शिवाजी महाराजांनी ‘जानकीचे कुलकर्ण सालाबाद चालले आहे. त्याप्रमाणे तिचे तिला चालवणे’ अशी आज्ञा दिलेली आढळते.
मराठाकालीन स्त्रीजीवनाचा अभ्यास करताना यातील कर्तृत्ववान स्त्र्ायांचा एक समान गुण समोर येतो तो म्हणजे या स्त्र्ायांचा आत्मविश्वास! रणांगणावर लढणाऱया रणरागिणी, राज्यकारभारात लक्ष घालणाऱया राजकारिणी, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱया गृहिणी, परमुलखात धाडसाने माहायात्रा करणाऱया धर्मपारायणी अशा आत्मविश्वासू स्त्र्ायांचे काही दाखले मराठा इतिहासाच्या कागदपत्रांमधून दिसतात.
मराठेकालीन समाजरचनेत वतनदारांची वतने वंशपरंपरेने चालत. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी-जोशी या वतनदारांच्या वतनाचे वादही पिढय़ान्पिढय़ा चालत. आपली ही पिढीजात वतने, पतिनिधनानंतरही चालवणाऱया आपल्या दत्तकवारसासाठी सरकार दरबारात दाद मागणाऱया स्त्र्ाया या काळात दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जवळजवळ 250 पत्रे उपलब्ध आहेत. यातील काही पत्रांतून महाराजांनी या वतनदारांचे वाद सोडवून त्यांना नवीन सनदा दिल्याचे दिसते. या 250 पत्रांत तीन-चार मोजकीच पत्रे स्त्र्ायांना दिलेली आहेत. यात वाईच्या सुभेदारास एक पत्र आहे की, पाचवडकर यांची लेक चंदाई हिच्या वाई परगण्यातील इनामांचा हिशोब करून हे इनाम तिच्या ताब्यात द्यावे.
पुण्यातील कसबा गणपतीचे पुजारी रंगनाथ सिदमठ ठकार यांना मावळातील नऊ-दहा गावांचे कुलकर्णवतन दादाजी कोंडदेवांपासून सुरू होते. रंगनाथ सिदभट ठकार यांच्या मृत्यूनंतर या वतनाचा कारभार त्यांची पत्नी जानकी रंगनाथ ठकार या शंकराजी भोवर नावाचा मुतालीक नेमून चालवीत होत्या. पुढे शंकराजी भोवरच या कुलकर्णपदावर आपला हक्क सांगू लागला. जानकी रंगनाथ ठकार यांनी शिवछत्रपतींच्या समोर याबाबत तक्रार मांडली. शिवाजी महाराजांनी या वतनाचे पूर्वीचे कागदपत्र पाहून आपल्या अधिकाऱयांना आज्ञा दिली की, ‘जानकीचे कुलकर्ण सालाबाद चालले आहे. त्याप्रमाणे तिचे तिला चालवणे.’
पुणे प्रांतातील निरथडी तर्फेतील किकवी, केंजळ, पांडे, सावरदरे आणि राजापूर या पाच गावांचे कुलकर्ण व जोशीपण लाळे घराण्याकडे होते. या लाळे घराण्यातील सईबाई लाळे यांनी आपल्या विवाहित पुत्राच्या मृत्यूसमयी विश्वनाथ नावाच्या परगोत्री मुलास दत्तक घेतले होते. या दत्तक वारसाचा वाद छत्रपती शिवाजी महाराजांपासून, शाहू छत्रपती, थोरले बाजीराव पेशवे, नारायणराव पेशवे असा सलग 100 वर्षे चालू होता. यातील मुख्य हकीकत अशी की, सईबाई लाळे आपला पुत्र अंताजी, सून भिऊबाई यांना घेऊन वाराणशीस माहायात्रेस गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर भिऊबाईंची बहीण मनूबाई, तिचा पती भगवंत गोपाळ आणि दोन मुलेही होती. यात्रेहून परत येताना वऱहाड प्रांतात सईबाईंचा मुलगा अंताजी महामारीने आजारी पडून मृत्यूपंथास लागला. अंताजीला व भिऊबाईला मूल नव्हते. आपला मृत्यू समोर पाहून अंताजीने आपली आई सईबाईच्या सांगण्यावरून, आपली मेहुणी मनूबाई हिचा दीड वर्षाचा मुलगा विश्वनाथ याला तिथेच दत्तकविधान करून दत्तक घेतले. या दत्तकविधानानंतर अंताजी लाळे लगेचच मृत्यू पावला. आपल्या घरी किकवीला परत आल्यावर सईबाईंनी ही सर्व हकीकत आपल्या गोत्रज-नातेवाईकांना एकत्र बोलावून सांगितली. पुढे योग्य वयात आपला दत्तक नातू विश्वनाथाचे उपनयन करून घेऊन त्याला आपल्या गोत्रात घेतले.
आपल्या मुलाने, अंताजीने अचानक ओढवलेल्या मृत्यूप्रसंगी घेतलेला दत्तक मुलगा, विश्वनाथ हा सगोत्री नसल्यामुळे, याच्या दत्तकविधानास आणि वतनास आपले गोत्रज-नातेवाईक पुढे त्रास देतील हे धोरणीपणाने जाणून सईबाईंनी आपल्या दत्तक नातवाची ही सर्व हकीकत छत्रपती शिवाजी महाराजांना सांगून या वतनाचे नवीन वतनपत्र देण्याची विनंती महाराजांना केली. शिवरायांनी गावचे देशमुख, देशपांडे, पाटील, बलुतेदार यांची याबाबत साक्ष घेऊन सईबाई लाळे यांना ‘आपली वृत्ती अनुभवून सुखरूप असणे’ असे वतनपत्र दिले. 1676-77 सालच्या या वारसाहक्काच्या कुलकर्णवतन पत्रासाठी सईबाईंनी सरकारात 150 होन म्हणजे जवळजवळ चाळीस तोळे किमतीची रक्कम शेरणी म्हणून भरली होती. गोत्रज आपल्या नातवाच्या वतनास त्रास देतील, दावे दाखल करतील हे धोरणीपणाने जाणून सईबाई लाळे-जोशी-कुलकर्णी या स्त्र्ााrने शिवाजी महाराजांकडून घेतलेले हे वतनपत्र, लाळे वंशजांनी पुराव्यादाखल पुढील काळात त्यांच्यावर गुजरलेल्या दाव्यांमध्ये न्यायासाठी दाखल केलेले दिसते.
छत्रपती शिवरायांनी स्त्र्ायांना दिलेल्या या मोजक्या तीन-चार पत्रांमधून तत्कालींन समाजातील स्त्र्ााrची भूमिका आणि शिवाजी महाराजांची स्त्र्ााr वतनदारांबाबतची सहानुभूतीची वागणूक समोर येते.
झाशीच्या राणीने आपल्या पतीसमवेत घेतलेला दत्तक-वारस तिच्या पतीनिधनानंतर परदेशी राज्यसत्तेच्या इंग्रजांनी नामंजूर केला. झाशी संस्थान खालसा करण्याची धमकी इंग्रजांनी राणीला दिली. या कपटी इंग्रजांपुढे आपल्या स्वराज्यासाठी आणि दत्तकपुत्रासाठी तलवार घेऊन लढणाऱया राणी लक्ष्मीबाईंच्या वीररसातील शौर्यकथा मराठा इतिहासात अमर आहेतच.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत)
n [email protected]





























































