
डिजिटल पेमेंट अॅप ‘पेटीएम’वरून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. पेटीएम युजर्ससाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण स्लॉट (Vaccine Slot booking) बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ज्या नागरिकांना कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिनचे स्लॉट हवे असतील त्यांना आपल्या जवळचे सेंटर्स शोधण्यासाठी पेटीएमने गेल्या महिन्यात ‘लोकेटर टूल’ सुरू केले होते. त्यापाठोपाठ आता लसीकरण नोंदणीची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारच्या नियमानुसार ज्यांना लस घेण्याची परवानगी आहे त्यांनाच या सुविधेचा वापर करता येईल.
सर्वप्रथम पेटीएम अॅप ओपन करा. जर तुमचे पेटीएम लॉगिन नसेल तर लॉग इन करा. त्यानंतर थोडे खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला Feature सेक्शनमध्ये Vaccine Finder चा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवे पेज सुरू होईल. त्या ठिकाणी पिनकोड पिंवा जिह्याचे नाव याबाबतची माहिती दिल्यावर नजीकच्या लसीकरण पेंद्राची माहिती उपलब्ध होईल. स्लॉट उपलब्धतेनुसार आवश्यक माहिती दिल्यावर पेटीएमद्वारे कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.



























































