आश्चर्य… ‘ही’ महिला साडीमध्ये करते वर्कआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहजरित्या व्यायाम करता यावा, याकरिता जिममध्ये जाणारे लोक सुटसुटीत पोषाख वापरतात, मात्र पुण्यात राहणारी एक 37 वर्षीय महिला चक्क साडीतच वर्कआऊट करते. साडीत वर्कआऊट करताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डॉ. शर्वरी इनामदार असे या महिलेचे नाव आहे. ही महिला साडी नेसून पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इक्लाइन बेंच प्रेस असे व्यायामाचे प्रकार करतात. वेट ट्रेनिंगशिवाय आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकत नाही. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्या साडी नेसून वेट ट्रेनिंग घेतात, असे शर्वरी यांनी सांगितले.

12जूनला त्यांनी साडी नेसून केलेल्या व्यायामाची क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली. डॉ. शर्वरी यांचे इन्स्टाग्रामवर 4 हजारपेक्षा फॉलोअर्स आहेत. आयुर्वेदात एम.डी. असलेल्या डॉ. शर्वरी यांना चार वेळा वुमेन वेट ट्रेनिंग पुरस्कार प्राप्त झाला आहे.