
48 मेगापिक्सलचा Redmi Note 10T लॉन्च, जाणून घ्या किंमत
जबरदस्त फीचर
या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड वर्जन 11 असणार आहे. या फोनची स्क्रीन साडे सहा इंच असून फुल एचडी असणार आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅम तर इंटर्नल स्टोरेज 128 जीबी इतकी आहे. या फोनमध्ये दोन मेगापिक्सला मायकोर कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा असणार आहे. फ़्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून ट्रिपल रियर कॅमेर्याचीही सुविधा आहे. हा ट्रिपल रीयर कॅमेरा तब्बल 48 मेगा पिक्सलचा असणार आहे.
बॅटरी आणि 5G
या फोनची बॅटरीची क्षमता 5 हजार एमएच आहे. तर 18 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. या फोनची युएसबी स्टाईल सी टाईप आहे. तर फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचाही समावेश आहे. फोनमध्ये 5G असून ब्लुटुथ वर्जनही अत्याधुनिक आहे. फोनचे वजन 190 ग्राम इतके आहे.
किंमत
सध्या हा फोन युरोप आणि रशियामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. हिंदुस्थानात लवकरच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रशिया युरोपमध्ये या फोनची किंमत 20 हजार 500 इतकी आहे. हिंदुस्थानात हा फोन 21 ते 23 हजार रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.





























































