
लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखली जाणाऱया हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आणखी दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात मितालीने हा कारनामा केला. 4 विकेटने सामना जिंकत मिताली जगातील सर्वाधिक सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे. मितालीने 317 सामन्यांत 10337 धावा केल्या असून तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्स (309 सामने 10,273 धावा) ला मागे टाकले. शार्लेटचा विक्रम मोडण्यासाठी मितालीला 11 धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज नॅट सिव्हरला चौकार ठोकत तिने हा टप्पा गाठला.



























































