फेसबुक युजर्सचा आयडी पासवर्ड चोरतात हे ऍप्स, लगेच करा डीलीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अँड्रॉईड फोन वापरत असताना सायबर धोका असतोच. जेव्हापासून थर्ड पार्टी लॉगिन सुविधा सुरू झाली आहे तेव्हापासून या हा धोका वाढला आहे. अनेकवेळेला युजर कुठल्याही अटी न वाचता फेसबुकच्या माध्यमातून ऍपमध्ये लॉगिन करतात. हे ऍप युजर्सचा डेटा चोरून परस्पर इतर कंपन्यांना विकून टाकतात. अशा प्रकारे 9 ऍप्सचा शोध लागला आहे जे फेसबुक युजर्सचे लॉग इन डीटेल्स चोरी करतात.

डॉक्टर वेब नावाच्या एका मॅलवियर विश्लेषकाने अशा 10 ऍप्सची माहिती दिली आहे जे फेसबुक युजर्सचा डेटा चोरतात. त्यापैकी एक ऍप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे परंतु 9 ऍप्सही आजही उपलब्ध आहेत. हे ऍप्स ग्राहकांसाठी धोकादायक असून ते लगेच डीलीट करा.

PIP Photo

हे ऍप एक फोटो एडिटर ऍप असून Lillians कंपनीने हे डेव्हलप केले आहे हे आतापर्यंत 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

Processing Photo

हे ऍपही एक फोटो एडिटर ऍप असून आतापर्यंत 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. या ऍपला hikumburahamilton कंपनीने विकसित केले आहे.

Rubbish Cleaner

हे ऍप मोबाईल फोनमधील मेमरी क्लिनरसाठी वापरण्यात येतं. हे ऍप SNT.rbcl कंपनीने विकस्ति केले असून प्ले स्टोअरवर आतापर्यंत 10 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

Horoscope Daily

दैनिक भविष्य दाखवणारे हे ऍप प्ले स्टोअरवर आतापर्यंत 10 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. HscopeDaily momo ने हे ऍप विकसित केले आहे.

Inwell Fitness

प्ले स्टोअर असंख्य फिटनेस ऍप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी हे एक ऍप आहे. हे ऍप आतापर्यंत 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. अनेक वेळा या ऍपने फेसबुक युजरचा पासवर्ड चोरले आहेत.

App Lock Keep

आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून अनेक युजर ऍप लॉक वापरतात. त्यापैकी हा एक ऍप. प्ले स्टोअरवरून 5 हजारहून अधिक वेळा हा ऍप डाऊनलोड करण्यात आला आहे. Sheralaw Rence कंपनीने हे ऍप डेव्हलप केले आहे.

 Lockit Master

ऍप लॉक असलेले आणखी एक ऍप जे प्ले स्टोअरवर आतापर्यंत 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. Enali mchicolo कंपनीने हे ऍप तयार केले आहे.

 Horoscope Pi

राशिभविष्य दाखवणारे हे ऍप आतापर्यंत एक हजावेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. असे असले तरी हे ऍप तितकेच धोकादायक आहे. Talleyr Shauna कंपनीने हे ऍप डेव्हलप केले आहे.

App Lock Manager

ऍप लॉकसाठी हे ऍप फार लोकप्रिय नाही तरी युजरच्या डेटासाठी धोकादायक आहे. आतापर्यंत हे केवळ 10 वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. Implummet col नावाच्या कंपनीने हे ऍप विकसित केले आहे.