शिवसेनेच्या आंदोलनामुळे कर्नाटक सरकार नमले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेनेच्या आंदोलनामुळे नमतं घेत कर्नाटक सरकारने ‘आरटीपीसीआर’ सक्तीचे नियम महाराष्ट्राच्या हद्दीतील नागरिकांसाठी शिथिल केले आहे. दरम्यान, जिल्हा शिवसेनेच्या वतीने सकाळी कागल येथील दूधगंगा नदीपुलावर आक्रमक आंदोलन करून काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता.

बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावा! केंद्र सरकारचे कर्नाटक सरकारला आदेश

बेळगावमध्ये कानडी भाषेची सक्ती झुगारत मराठी भाषेच्या हक्कासाठी पिढय़ान्पिढय़ा संघर्ष करणाऱया सीमा बांधवांच्या लढय़ाला अखेर यश आले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर मराठी फलक लावा तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा, असे आदेशच केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला दिले आहेत. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश बजावला आहे.