
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आरक्षणाचे समर्थन केले आहे. दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी आरक्षणाचे समर्थन केले आहे. आरक्षण ही देशाची ऐतिहासिक आवश्यकता आहे असे होसबाळे म्हणाले.
I & my organisation have been stronger supporters of reservation for decades…. We time & again declared that reservation is the historic necessity of our country as long as there is inequality being experienced by a particular section of society: RSS leader Dattatreya Hosabale pic.twitter.com/7KMIkACnZX
— ANI (@ANI) August 10, 2021
होसबाळे म्हणाले की मी आणि माझी संस्था आरक्षणाचे समर्थन करतो. देशाच्या प्रगतीसाठी दलित समाजाचे मोठे योगदान आहे, त्यांच्या योगदानाचा उल्लेख न केल्यास देशाचा राजकीय, साजामिक, अध्यात्मिक इतिहास अपूर्ण आहे असे होसबाळे म्हणाले. जोपर्यंत समाजात विषमता आहे, तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे असेही होसबाळे यांनी नमूद केले.
आरक्षणाचेही यापुर्वीही समर्थन
संघाने आरक्षणाचे समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सरकार्यवाह होसबाळे यांनी आरक्षणाचे समर्थन केले आहे. सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात होसबाळे यांनी अशाच प्रकारे आपले विचार व्यक्त केले होते. देशात असमानता आहे, तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. देशातील विषमता संपुष्टात येईल, त्यावेळी आरक्षणाबाबत विचार करण्यात येईल, असे होसबाळे यांनी सांगितले. विषमता संपली असा विश्वास जनतेत निर्माण होईल, त्यावेळी यावर विचार करण्यात येईल. मात्र, सद्यस्थितीत आरक्षण सुरू ठेवण्याची गरज आहे असे होसबाळे म्हणाले होते.




























































