
आयटेल (Itel) कंपनीने हिंदुस्थानमध्ये आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Itel A48 लॉन्च केला आहे. 2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आणि वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले हे या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य आहे. अँड्रॉईड 10 वर हा स्मार्टफोन चालतो आणि यात फेस व फिंगरप्रिंट अनलॉक यासारखे आधुनिक फीचर्सही आहेत.
वैशिष्ट्य –
– 6.1 इंच एचडी+ (1560×720 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले
– स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे
– 1.4 गीगाहर्ट्ज प्रोसेसर
– 2 जीबी रॅम आणि 23 जीबी इंटर्नल स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणार)
– 3000mAh ची बॅटरी
– ड्यूल-सिम सपॉर्ट
– 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स
– 5 मेगापिक्सलचे दोन सेन्सर
– सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेन्सर

किंमत –
Itel A48 किंमत 6 हजार 399 रुपये आहे. अॅमेझॉनवर हा फोन तुम्ही खरेदी करू शकता, मात्र येथे फोन 6 हजार 999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर
Itel A48 हा स्मार्टफोन काळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तसेच कंपनी या फोनसोबत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरही देत असून फोन घेतल्यानंतर 100 दिवसात स्क्रीट फुटल्यास फुकटात रिप्लेस करून मिळणार आहे.

ऑफर
Itel A48 या स्मार्टफोनसोबत कंपनीने अन्य काही ऑफरही दिल्या आहेत. अॅमेझॉनवरून Itel A48 खरेदी केल्यास 329 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट इएमआय ऑफर यावर देण्यात आली आहे. तसेच जिओ-एक्सक्लूसिव्ह ऑफरमध्ये एनरोल केल्यास 512 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही ग्राहकांना मिळू शकतो.




























































