पुण्यात मोबाईल हिसकाविणाऱ्या परप्रांतीयांना अटक; 8 मोबाईलसह दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात नागरिकांचे मोबाईल हिसकाविकावून विक्रीचा धंदा करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 मोबाईल आणि दुचाकी असा सव्वा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रमेश नागेश माने (वय 19 रा. माळवाडी, हडपसर, मूळ- कर्नाटक) आणि विनोदकुमार केसकुमार वर्मा (वय 21 रा. चित्रपुर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दुचाकीवरून नागरिकांचे मोबाईल चोरी केलेला आरोपी मोबइल विक्रीसाठी महादेवनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विनोद शिवले आणि अकबर शेख यांना मिळाली. तसेच कोंढव्यातील कॅफेमधून मोबाईल चोरी केलेला आरोपी खडीमशीन चौकात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे आणि चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील यांच्या पथकाने रमेश माने आणि विनोदकुमार वर्मा यांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हण, विनोद शिवले, अकबर शेख महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, प्रविण काळभोर, पृथ्वीराज पांडोळे, गायकवाड, संजयकुमार दळवी, दिपक लांडगे, दाऊद सय्यद, विशाल भिलारे, अजय गायकवाड, अमर उगले, स्नेहल जाधव,स्वाती गावडे यांनी केली.