IPL 2021 चेन्नईने केली पराभवाची परतफेड, मुंबईचा 20 धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये आजपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या उर्वरित्र सत्राच्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने मुंबईपुढे विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईच्या संघाला हे आव्हान पेलवले नाही. मुंबईचा संघ 20 षटकात 136 धावाच करू शकला. या विजयासह चेन्नईने हिंदुस्थानमध्ये आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात मुंबईकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली.

रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 156 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने यूएईतील आपली दमदार कामगिरी कायम राखत नाबाद अर्धशतक झळकावले. यूएईमध्ये गायकवाड याने गेल्या चार लढतींमध्ये अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.

Breaking – विराटचे धक्कातंत्र कायम, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. चेन्नईचे चार फलंदाज 30 धावांच्या आत बाद झाले. यानंतर रविद्र जाडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी संघाला शंभर धावांचा टप्पा गाठून दिला. जाडेजा 26 धावा काढून बाद झाला.

IPL 2021 एकाच देशाच्या 6 खेळाडूंनी घेतली माघार, चाहत्यांना उणीव भासणार

यानंतर गायकवाडला साथ देण्यासाठी ड्वॅन ब्रावो मैदानात उतरला. ब्रावोने सलग तीन चेंडूवर षटकार ठोकले. मात्र अखेरच्या षटकात तो 8 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. गायकवाडने 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. मुंबईकडून बुमराह, मिल्ने आणि बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले.

Photo – क्रिकेटपटूंसोबत लग्नानंतर ‘या’ अभिनेत्रींनी कलेच्या मैदानापासून घेतली फारकत