लेहमध्ये जगातील सर्वात मोठय़ा तिरंग्याचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधीजींच्या 152 व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचे अनावरण लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी हिंदुस्थानचे लष्करप्रमुख मनोज नरवणेदेखील उपस्थित होते. हिंदुस्थानी लष्कराच्या 57 इंजिनीअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे. हा महाकाय राष्ट्रध्वज हिंदुस्थानी जनता आणि लष्करी जवानांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरणार आहे. लेहमध्ये 2000 फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल 225 फूट आहे. तर ध्वजाची रुंदी 150 फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल 1,400 किलोग्राम इतके आहे. 57 इंजिनीअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी मिळून हा ध्वज 2000 फूट उंचीच्या टेकडीवर नेला.