
राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील प्रकल्प, योजनांना अर्थसहाय्याची गरज असते. त्यासाठी नाबार्डकडून अधिकाअधिक अर्थसहाय्य मिळवणे आवश्यक आहे. यासाठी विविध विभागांनी त्यांच्याशी निगडित क्षेत्रांबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या नेतृत्काखालील वरिष्ठ अधिकाऱयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील महत्त्वपूर्ण योजना, प्रकल्प यांना वित्तीय सहाय्याची आवश्यकता भासते. त्यासाठी नाबार्ड आणि विविध विभागांचा समन्कयही आवश्यक आहे. राज्यातील पायाभूत सुविधा तसेच विविध योजना, प्रकल्पांना नाबार्डकडून वित्तीय सहकार्य मिळावे यासाठी त्या त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन, प्राधान्यक्रम आणि निश्चित असा आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी नाबार्डच्या करिष्ठ अधिकाऱयांशी समन्वय राखण्यात यावा.’
‘वर्षा’ येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिक मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिक मनीषा म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.




























































