टपाल तिकिटांवर पक्ष्यांचा संचार, राहुल भागवत यांची सोशल मीडियावर अनोखी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना स्टॅम्प गोळा करायचा छंद असतो. टपाल खातेही वेगवेगळ्या विषयांवरचे स्टॅम्प वरचेवर जारी करत असते. यामध्ये पक्ष्यांवर आधारित स्टॅम्पचाही समावेश आहे. अशा स्टॅम्पची माहिती पक्षीप्रेमींना व्हावी या उद्देशाने बडोदा येथील वन्य जीव छायाचित्रकार राहुल भागवत यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून अनोखी मोहीम सुरू केली आहे. या पेजद्वारे हिंदुस्थानात आढळणाऱया पक्ष्यांच्या स्टॅम्पची माहिती शेअर केली जात आहे.

अवघे 60 पक्षी पोस्टाच्या स्टॅम्पवर

आपल्याकडे पक्ष्यांच्या सुमारे 1300 प्रजाती आहेत. त्यापैकी फक्त 60 प्रजाती पोस्टाच्या स्टॅम्पवर दिसतात. पक्ष्यांवर जे स्टॅम्प जारी झालेले आहेत, त्यांची माहिती फेसबुक पेजवर शेअर करण्याचे आवाहन करत आहोत, असे राहुल भागवत यांनी सांगितले.

13 ऑक्टोबर हा दिवस ‘नॅशनल फिलाटेली डे’ म्हणून साजरा केला जातो. संग्रहकांसाठी हा खास दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून राहुल भागवत यांनी ‘पार्लमेंट ऑफ बर्ड फिलाटेलिस्ट’ हे फेसबुक पेज तयार केले आहे. हिंदुस्थानी उपखंडातील पक्ष्यांवरचे स्टॅम्प वा पाकिटं आणि त्यांची माहिती शेअर करण्याचे आवाहन पक्षीप्रेमी आणि संग्रहकांना करण्यात आले आहे. अन्य देशांनी जर हिंदुस्थानात आढळणाऱया पक्ष्यांवर स्टॅम्प साकारला असेल तर त्याची माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. उदाहरणार्थ- व्हिएतनाम देशामध्ये ‘इंडियन स्कीमर’चा स्टॅम्प आहे.

n 31 डिसेंबर 1968 रोजी देशातील पहिला पक्षी स्टॅम्प जारी करण्यात आला. हा स्टॅम्प लाल चोच असलेला ब्लू मॅगपी म्हणजे नीळकंठ पक्ष्याचा आहे.
n 18 मे 1985 रोजी देवहंस म्हणजे व्हाईट विंग वुड डक पक्ष्यावर स्टॅम्प काढलेला आहे. 1976 सालचा हिमालयन मोनाल स्टॅम्प, बीएनएचएलचा इंडियन हॉर्नबिल स्टॅम्प, जयपूरमधील हुकना पक्ष्याचा स्टॅम्प, बांगलादेशाच्या टपाल तिकिटावरील दयाळ पक्षी आदींची माहिती फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेली आहे.