तब्बल पाच वर्षानंतर सोमठाणा धरण ‘ओव्हरफ्लो’, पर्यटकांसाठी पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
somthana-dam-overflow

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सोमठाणा येथे उंच गडावर असलेल्या रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी असलेले हे सुंदर धरण तब्बल पाच वर्षांनंतर यंदा तुडुंब भरून ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

खुलताबाद, म्हैसमाळ आणि सारोळ्याच्या डोंगररांगातून उगम पावणाऱ्या दुधना नदीवर 1965 साली बांधलेले हे धरण अत्यंत नयनरम्य आहे. हे धरण आणि डोंगररांगातून खळाळत येणाऱ्या वेगवान जलप्रवाहाचे हे पाणलोट क्षेत्र ‘टूरिस्ट स्पॉट’ म्हणून ‘डेव्हलप’ करावे अशी इच्छा आता व्यक्त होत आहे. यंदाच्या जबरदस्त पावसामुळे गेले अनेक दिवस हा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहतो आहे. दुधनेचे हे पाणी सुमारे पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार करून परभणीजवळ पूर्णा नदीला मिळते. जालन्याकडे जाताना बदनापूरच्या आधी सोमठाणा फाटा लागतो. तिथून जेमतेम पाच कि.मि. अंतरावर असलेले हे रम्य ठिकाण एका दिवसाच्या पर्यटनासाठी उत्तम आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)