
जीप इंडियाने आज त्यांची आघाडीची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मोहीम ‘मिशन वन अर्थ’च्या शुभारंभाची घोषणा केली. ही मोहीम विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीप ग्राहक व समुदायाला जबाबदारीने साहसी अनुभवाचा आनंद घेण्यास प्रोत्साहित करेल.
या मोहिमेअंतर्गत पहिल्या प्रकल्पाला सुरूवात करत जीप इंडियाने पर्वतरांगेकडे जाणा-या रस्त्यांवरील 1500 किलोग्रॅम्स प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी ग्राहक आणि दिग्गज हिमालयाचे आश्रयस्थान असलेल्या लडाख प्रांताच्या समुदायाला एकत्र आणले. या पर्वतरांगेमध्ये जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्ते आहेत.
यंदा मिशन वन अर्थ जीप इंडियाचा उत्साहवर्धक वार्षिक ग्राहक ड्राइव्ह अनुभव देणारा उपक्रम लीजेण्डरी जीप ट्रेल्सशी एकीकृत करण्यात आली. जीप ग्राहकांनी या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेसाठी वीस जीप एसयूव्हींमधून लेहमार्गे शिमला ते श्रीनगर हा 2000 किमीहून अधिक अंतराचा प्रवास केला. स्थानिक लडाख समुदायामधील तीनशेहून अधिक लोकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
स्टेलन्टिस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रोलंड बुचरा म्हणाले, ”आठ दशकांपासून जीपने साहसी ड्रायव्हिंगच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले आहे. मिशन वन अर्थ या साहसाला विशेष हेतू देते, ज्यामुळे जीप ग्राहक जबाबदारीने या साहसी ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात.”
जीप इंडियाचे प्रमुख निपुन जे. महाजन म्हणाले, ”मिशन वन अर्थ ही आमचे ध्येय ‘रिस्पॉन्सिबल अॅडवेन्चर’च्या माध्यमातून ग्राहकांना जीप लाइफचा जबाबदारीने आनंद घेण्यास सक्षम करण्याचे व्यापक ध्येय संपादित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. आम्ही आगामी महिन्यांमध्ये देशभरातील जीप नेटवर्क सहयोगी व जीप ग्राहकांसोबत आमचे ध्येय शेअर करत मिशन वन अर्थला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.”
या उपक्रमाच्या माध्यमातून जीप ब्रॅण्डने पर्यटकांची रेलचेल असलेल्या भागांमध्ये, तसेच उंच हिमालया पर्वतरांगांमध्ये विशेषत: डिझाइन केलेल्या व डिजिटली सक्षम ‘रिव्हर्स वेण्डिंग मशिन्स’ तैनात केल्या आहेत. गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे जीप मर्चंडाइजमध्ये पुनर्चक्रण करण्यात येईल. रिव्हर्स वेण्डिंग मशिन्समध्ये कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना एक कूपन मिळेल, जे पर्यावरणास अनुकूल जीप मर्चंडाइजसाठी रिडिम करता येऊ शकते आणि जीप इंडिया हे मर्चंडाइज व्यक्तिश: थेट पर्यटकांकडे पाठवतील. रिव्हर्स वेण्डिंग मशिन्स या पर्यटन ठिकाणी कायम तैनात राहतील आणि वर्षभर जीप इंडियाकडून त्यांची देखरेख व व्यवस्थापन पाहिले जाईल.
जीप ब्रॅण्डला अनेक सामाजिक कार्यांची जाणीव आहे, जे दरवर्षी मिशन वन अर्थ अंतर्गत राबवण्यात येतील. या मोहिमेचा ग्राहकांना जबाबदारीने साहसी ड्रायव्हिंगचा आनंद घेण्यासोबत त्यांच्या जीप एसयूव्हींमधून प्रवास करणाऱ्या प्रदेशामध्ये स्वच्छता राखण्यास प्रोत्साहित करण्याचा मनसुबा आहे.
आगामी महिन्यांमध्ये भारतातील प्रत्येक जीप डिलरशिपमध्ये मिशन वन अर्थ मोहिम राबवण्यात येईल, ज्यामुळे या संदेशाचा प्रसार होण्यास मदत होईल. जीप आठ दशकांहून अधिक काळापासून प्रेरक ब्रॅण्ड राहिला आहे. ब्रॅण्डने लोकांना एकत्र आणण्यासोबत जगभरातील समुदायांना आकार दिला आहे. ब्रॅण्डच्या थोर कार्यामध्ये जीप ग्राहकांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल आणि हा उद्देश मिशन वन अर्थ मोहिमेमध्ये देखील कायम राहिल.
























































