भरत जाधवचे डिजिटल पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘सही’ अभिनेता भरत जाधव आता डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया एकत्रितपणे ओटीटी चॅनेल सुरू करणार आहेत. त्यावर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत.

या ओटीटी चॅनेलची पहिली निर्मिती असलेल्या आगामी प्रोजेक्टमध्ये भरत जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावरून पह्टो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. स्वप्नीलने म्हटलेय, ‘‘आपल्या बहुभाषिक ओटीटीच्या पहिल्या निर्मितीला सुरुवात मायमराठी भाषेत, सगळ्यांच्या लाडक्या भरत जाधवसोबत.’’ स्वप्नीलने शेअर केलेल्या पह्टोमधील क्लॅपबोर्डवर ‘प्रोजेक्ट वन’ असे लिहिलेले दिसत आहे. हा चित्रपट आहे की वेब सीरिज तसेच या प्रोजेक्टचे नाव नक्की काय असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.