
कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील सध्या अटके असलेला पंच किरण गोसावीसोबत भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीची व्यावसायिक भागीदारी आहे. भाजपचे काही नेते व त्यांचे उजवे हात दोन दिवसांपासून एनसीबी कार्यालयात जाऊन समीर वानखेडे यांच्या भेटी घेत आहेत. डिसेंबर महिन्यात होणाऱया अधिवेशनात या प्रकरणातील सर्व माहिती ‘रेकॉर्ड’वर आणणार आहोत. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा स्पह्टक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला.
क्रूझ पार्टीचा आयोजक काशिफ खान आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मैत्री असल्याचा गौप्यस्पह्ट केल्यानंतर नवाब मलिक यांनी आरोपांच्या नव्या मालिकेत थेट भाजपलाच लक्ष्य केले. भाजपच्या नेत्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून एनसीबीच्या कार्यालयात फेऱया वाढल्याचा आरोप केला.
पुढील महिन्यात 7 डिसेंबरपासून नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. पण आता भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या आरोपांना उत्तर देऊन या प्रकरणावरून लक्ष अन्यत्र वळवणार नाही, पण अधिवेशनात अनेकांची नावे समोर आणणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
मी भंगारवाला
आपण भंगारवाला असल्याचा मला अभिमान असल्याचे नवाब मलिक यांनी एका उत्तरात स्पष्ट केले. शहरातील भंगारांचे एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार, शहरातील या भंगार लोकांचे पाणी करू असा इशारा त्यांनी दिला. नवाब मलिक यांची मुलगा सना मलिक शेख यांनीही ‘होय, मी भंगारवाल्याची मुलगी. मला अभिमान आहे मी मराठी मुलगी’ असे ट्विट केले आहे.
भाजपचा पोपट
समीर वानखेडे हे भाजपचा पोपट आहेत आणि वानखेडे यांचा जीव भाजपमध्ये आहे. पोपट अडकल्याने भाजप तडफडत आहे. कारण पोपट पिंजऱयात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येतील अशी भाजपला भीती असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
बॉलीवूड यूपीवूड होणार नाही
सध्या भाजपचे लोक बॉलीवूडला अशा प्रकारच्या खोटय़ा कारवाया करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम अशा मराठी मंडळींनी केले आहे. मुंबईतील चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशला नेण्याचा डाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून रचला जात आहे, पण बॉलीवूड कधीही यूपीवूड कधीही होणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले.






























































