शवागारातील 100 हून अधिक मृतदेहांवर बलात्कार, विकृताचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शवागारातील महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याचा खुलासा एका विकृताने केला आहे. या विकृत इसमावर दोन जणींची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हा खुलासा झाला आहे.

ही घटना युनायटेड किंग्डम इथली असून डेव्हिड फुलर असं या विकृताचं नाव आहे. व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेल्या डेव्हिडने 1987साली दोन महिलांचा खून करून त्यांच्यावर बलात्कार केला होता.

या प्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या चौकशी दरम्यान त्याच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा काही धक्कादायक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या.

त्याच्याकडे काही आक्षेपार्ह व्हिडीओ होते. त्याने 2008 ते 2020 दरम्यान शवागारातील अनेक मृतदेहांवर बलात्कार केले होते. त्याचं चित्रण त्या व्हिडीओंमध्ये होतं. यात 9 वर्षांच्या मुलीपासून ते 100 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचा समावेश आहे.

त्याने हे कृत्य केल्याची कबुली देखील पोलिसांना दिली. या प्रकरणी केंट परगण्यातील पोलिसांनी अनेक पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. डेव्हिड विरोधात अजून सबळ पुरावे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.