
दिवाळीनिमित्त द्वारकामाई चॅरिटी फाउंडेशन संस्थेच्यावतीने ट्रॅफिक सिग्नलवर राहणाऱ्या गरिबांसाठी दिंडोशी विधानसभेच्या वेगवेगळ्या ट्रॅफिक सिग्नलवर एकाच वेळी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गरीब कुटुंबे व त्यांच्या मुलांना हॉटेलमध्ये जेवायला जाता येत नाही. त्यामुळे द्वारकामाईने स्वतः त्यांच्या दारात पोहोचून त्यांना हॉटेलसारखे स्वादिष्ट पदार्थ वाटून सर्वांना आनंद दिला. गरीब मुले, वृद्ध, महिला यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आम्हालाही आनंद मिळतो. समाजातील उच्च-नीच, गरिबी-श्रीमंत, अस्पृश्यता, जात-पात भेदभाव दूर करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे संस्थेचे अध्यक्ष गौरीशंकर चौबे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील मान्यवर व पाहुण्यांनीही भोजनाचा आस्वाद घेतला.




























































