जिनोम सिक्वेंसिंग – 281 चाचणींत आढळला सौम्य डेल्टा! लस न घेतलेल्या चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या चौथ्या जिनोम सिक्वेंसिंग चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून 281 चाचण्यांमध्ये ‘सौम्य डेल्टा’ आढळला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे 75 टक्के तर डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 25 टक्के रुग्ण आढळले आहेत. या चाचण्यांमध्ये न घेतलेल्या चार जणांचा मृत्यू झाला असून लस घेतलेल्या एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून जास्त काळ आपल्या बदलत्या स्वरूपाने रुग्णांसह नागरिकांना धडकी भरवणाऱया कोरोनाच्या नव्या रूपाची चाचणी करण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये चौथ्या अहवालात एकूण 345 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 281 नमुने हे मुंबईतील होते. यातील 75 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिअंटचे तर 25 टक्के रुग्ण डेल्टा डेरिव्हेटिव्हचे असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

नव्या प्रकाराचा धोका कमी

या दोन्ही प्रकारांतील कोरोना विषाणू हा सौम्य स्वरूपाचा असून त्यापासून गंभीर धोका संभवत नाही. शिवाय डेल्टा व्हेरिएंटसमवेत तुलना केल्यास संक्रमण आणि प्रसाराचा वेगही कमी आहे. असे असले तरी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यास तातडीने उपचार करावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्त्काचे म्हणजे, कोकिड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास या 281 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त आठ जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त 21 जणांना रुग्णालयात दाखल कराके लागले. यापैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढकला नाही.

मुंबईतील 281 रुग्णांपैकी 26 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 85 रुग्ण (30 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 96 रूग्ण (34 टक्के), 61 ते 80 वयोगटात 66 रुग्ण (23 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 8 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.