तब्बल 17 दिवसांनंतर देवरुख एसटी आगारातून गुरुवारी तीन बस धावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्र्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी महामंडळाचे शासनाकडे विलणीकरण व्हावे व अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले आहे. तसेच आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र, गुरुवारी दुपारी 3 वाजता देवरुख संगमेश्वर,देवरुख पिरंवदने या मार्गावर दोन बस रवाना झाल्या. शुक्रवारी सकाळी आणखी काही बस सुटतील असे सांगण्यात आले आहे. तरीही काही चालक, वाहक वगळता बाकी इतर चालक,वाहक व कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

देवरुख एसटी आगारात 9 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. तब्बल 17 दिवसानंतर देवरुख आगारातून दोन बस धावल्या. देवरुख आगारातील टि.ए.जाधव, डी.टी.शिर्के, जे.डी.भोसले, एम.ए.शिंदे या चालक,वाहकांनी कामावर हजर होत या फेर्‍या सुरु केल्या. देवरुख संगमेश्वर अशा दोन फेर्‍या व एक पिरंदवणे वस्तीसाठी बस धावली. पगारवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तरी विलिनीकरणाबाबत ठोस तोडगा न निघाल्याने संप सुरुच आहे. कामावर हजर व्हायचे नाही, असा निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे. संप सुरु होतानाच आगारप्रमुख गाडे यांनी कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हा, असे आवाहन केले होते.मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम रहात कर्मचार्‍यांनी संप सुरुच ठेवला आहे. जे चालक,वाहक हजर झाले आहेत त्या बस फेर्‍या सुरु झाल्या आहेत.देवरुख आगारातुन बस सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.