
फाळणीच्या वेळी आपल्या देशाने मोठे दुःख सहन केले आहे. आता पुन्हा देशाची फाळणी होणार नाही असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. विभाजनकालीन भारत के साक्षी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी नोएडात ते बोलत होते.
भागवत म्हणाअले की, हिंदुस्थानची फाळणीमुळे कोणीही आनंदी नव्हते. ही घटना कुणीच विसरू शकत नाही. हे घटना अत्यंत वेदनादायी आहे. ही वेदना तेव्हाच समाप्त होईल जेव्हा ही फाळणी रद्द होईल. जी भूमी खंडित झाली आहे, ती परत अखंडित झाली पाहिजे असे भागवत म्हणाले. तसेच हा 2021 चा हिंदुस्थान आहे, 1947 चा नाही. आता हिंदुस्थानची फाळणी होणार नाही, जो कोणी या भूमीला खंडित करण्याचा प्रयत्न करेल त्याचेच खंडन होईल असेही भागवत यांनी नमूद केले.


























































