
अंबरनाथ येथे सुरू असलेल्या 14 वर्षांखालील जेएसपी ट्रॉफी क्रिकेट साखळी सामन्यात श्री माँ गुरुकुल संघाच्या अथर्व अमोल सुर्वे याने नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून देत ‘सामनावीर’ हा किताब पटकावला. श्री माँ गुरुकुल आणि अंबरनाथ क्रिकेट अॅपॅडमी अंबरनाथ क्रिकेट अॅपॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांत सर्व बाद 199 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्री माँ गुरुकुल संघातील सलामीचे फलंदाज पार्थ देशमुख आणि ऋजुल रांजणे यांनी 53 धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र ऋजुल रांजणे बाद झाल्यानंतर श्री माँ गुरुकुल संघाची मधली फळी ढेपाळली. 27 व्या षटकांत 7 गडी बाद 123 अशी श्री माँ गुरुकुलची धावसंख्या होती, परंतु त्यानंतर खेळावयास आलेल्या अथर्व सुर्वे याने या सामन्यात दमदार खेळी केली. विजयी चौकारासह अर्धशतक पूर्ण करत अथर्वने 52 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. श्री माँ गुरुकुलचे मुख्य प्रशिक्षक दर्शन भोईर आणि प्रीतेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व क्रिकेटचे धडे घेत आहे.



























































