छोटे उस्ताद होणार सुपरस्टार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

टेलिव्हिजनवरील रिऑलिटी शोच्या धडाक्यात आणखी एका नव्या शोची भर पडली आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ असे या सिंगिंग रिऑलिटी शोचे नाव आहे. 5 ते 14 या वयोगटातील छोटय़ा उस्तादांना या अनोख्या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळणार आहे. परीक्षकांच्या भूमिकेत अभिनेते सचिन पिळगावकर, गायिका वैशाली सामंत आणि गायक आदर्श शिंदे असतील.

याविषयी सचिन म्हणाले, मी पार्श्वगायक म्हणून 200 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मी बऱयाच गाण्यांचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. मात्र आजवर एकाही सिंगिंग शोचे परीक्षण केलेले नाही. लहान मुलांच्या विश्वात हरवण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर 4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.