
नवसाला पावणारी देवी अशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रविवारी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली. दरवर्षी देवीचे धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाचा दिवस ठरतो.





























































