स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बार्टीमार्फत बँक, रेल्के, एल.आय.सी. ई. व तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता काही तांत्रिक अडचणीमुळे 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्याकरिता मुदतवाढ दिली आहे तसेच चाचणी परिक्षेत 26 डिसेंबर 2021, रविवार रोजी असा बदल करण्यात आला आहे. देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा, असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविले असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.