शास्त्रज्ञांनी शोधली शरीरातली नवीन पेशी! ‘या’ अवयवासाठी आहे उपयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवी शरीर ही एक अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. शरीरात विविध प्रकारच्या पेशी, स्राव, हाडं, स्नायू, कोशिका, धमन्या यांपासून बनलेले अवयव असतात. प्रत्येक घटकाची रचना आणि कार्य ठरलेलं असतं. आतापर्यंत मानवी शरीरातील प्रत्येक घटकाविषयी वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती होती. मात्र, आता मानवी शरीरातील एका नव्या पेशीचा शोध लागला आहे.

या भागाचा उल्लेख किंवा शोध यापूर्वी कधीही लागला नव्हता. शास्त्रज्ञांनी मानवी जबड्यातील या पेशीचा शोध लावला आहे. मास्सेटर नावाच्या एका पेशीच्या तिसऱ्या थराखाली ही पेशी सापडली आहे. मास्सेटर ही एक मांसपेशी असून तिचा वापर करूनच आपलं शरीर जबड्याच्या खालच्या भागाची हालचाल करतं. खालच्या जबड्याची उघडझाप किंवा अन्न चावण्याच्या प्रक्रियेत मास्सेटर ही मांसपेशी महत्त्वाची भूमिका बजावते.

मास्सेटर ही मांसपेशी तीन थरांची बनलेली असते. नवीन सापडलेली पेशी ही मास्सेटरच्या तिसऱ्या थराखाली सापडली आहे. या पेशीचा उल्लेख आजवर मानवी शरीरविज्ञानात आजपर्यंत झाला नव्हता. हा शोध सायन्स जर्नल्स एनल्स ऑफ अॅनॉटोमीच्या ऑनलाईन आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला आहे.

हा शोध मांडण्यासाठी जो प्रबंध मांडण्यात आला आहे, त्यासाठी 12 मृतदेहांचा अभ्यास करण्यात आला. या मृतदेहांची शिरं कापून त्यांना फॉर्मल्डेहाईड नावाच्या एका रासायनिक द्रावणात ठेवण्यात आलं. जेव्हा या शिरांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला, तेव्हा त्यांना हा शोध लागला. हा खोलवर असलेला थर ज्या प्रक्रियेने चलनवलन करतो त्याला जायगोमॅटिक प्रोसेस असं म्हणतात. याच प्रोसेसमुळे गालांच्या स्नायूंची हालचाल होते.