मुंबई जिल्हा बँक निवडणूक, चार जागांसाठी आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार मतदारसंघांतील संचालक निवडीसाठी उद्या रविवार, 2 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्राधिकरणाने शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी.एस. हायस्कूलची निवड केली आहे. चार जागांसाठी मतदान होणार असून एपूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर 10 हजार 191 मतदार आहेत.

मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक निवडीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर प्राथमिक सहकारी संस्था गट, मध्यवर्ती ग्राहक संस्था गट, महिला सहकारी संस्था गट आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागासवर्ग गट या चार मतदारसंघांत प्रत्येकी एक जागा असून त्यासाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

त्यासाठी रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक पैलास जेबले यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.