मुंबईतील मालमत्ता कर 2020पासून माफ करा, काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. हा कर पूर्वलक्षी प्रभावाने 2020पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून 10 मार्च 2019 रोजी मालमत्ता करातला सर्वसाधारण कर माफ केला. यात जल कर, जल लाभ कर, मलनिःसारण कर, शिक्षण उपकर, राज्य शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष उपकर व पथकर माफ करण्यात आले नव्हते. त्यामुळे एकूण मालमत्तेच्या केवळ 10 टक्के कर माफ करण्यात आला. त्यामुळे या रहिवाशांना 2019-20पासून मालमत्ता करमाफी व्हायला हवी. त्याचप्रमाणे 750 चौरस फुटांत राहणाऱ्या रहिवाशांना मालमत्ता करात 60 टक्के इतकी सवलत देण्यात यावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे.