
पुण्यात 19 डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रायपूर येथून अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. कालीचरण महाराज यांच्या वादग्रस्त विधानाबाबत गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बचाव आणि सरकारी पक्षाकडून म्हणणे मांडण्यात आले.


























































