
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या भूलथापा मारून फसवणूक करणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. पवन सिंग ओ. जी. सिंग धारिवाल असे त्याचे नाव आहे. पोलीस त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
गतवर्षी तक्रारदाराला फोन आला होता. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी पदावर भरती सुरू असल्याच्या भूलथापा मारल्या. तक्रारदाराने त्याची कागदपत्रे पाठवली तसेच एकाच्या बँक खात्यात पावणेचार लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे जमा केल्यानंतर तक्रारदाराने संपर्क साधला असता आरोपीशी संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी पवनला अटक केली.





























































